⚡बांदा ता.१०-: बांदा वाफोली मार्गावर गवळीटेम्ब वाडीपर्यंत अद्यापपर्यंत गटाराचे काँक्रिटीकरण न केल्याने येथील नागरिकांना अनेक समस्याना समोरे लागत आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य मासिक सभा किंवा ग्रामसभेत यासंदर्भात कामाची मागणी करत असल्याने येत्या २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात बांदा सरपंच यांच्यासह जिल्हाधिकारी, सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
श्री खान यांनी निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरातील निमजगावाडी व गवळीटेम्बवाडी येथील घरांच्या नोंदी या बांदा ग्रामपंचायत हद्दीत आहेत. त्या अनुषंगाने येथील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज व इतर सुविधा देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. बांदा शहरातील इतर सर्व ठिकाणच्या रस्त्याच्या गटारांचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. मात्र बांदा शंकर मूर्ती ते गवळीटेम्ब वाडीतील रस्ते हे पूर्णपणे दुर्लक्षित आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना कल्पना देण्यात आली आहे. मात्र त्यांनी कधीही यासंदर्भात भूमिका घेतली नाही किंवा प्रश्न मांडला नाही. या रस्त्यावर गटार बांधकाम झाल्यास हा रस्ता सुस्थितीत राहणार आहे.
यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अन्यथा २६ रोजी बांदा वाफोली ग्रामीण रस्त्याच्या लगत बेमुदत आंदोलन करण्यात येईल.
वाफोली गवळीटेम्ब वाडीपर्यंत गटाराचे काँक्रिटीकरण न केल्याने २६ जानेवारीला रियाज खान यांचा उपोषण करणार…
