⚡बांदा ता.१०-: सावंतवाडी तालुक्यातील गाव मौजे निगुडे या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी पदी राजेश मयेकर यांची निवड झाली गेले अनेक वर्ष विशेष कार्यकारी अधिकारी नसल्यामुळे महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत होते.त्यामुळे आज विशेष कार्यकारी अधिकारी पद निगुडे गावाला मिळाल्यामुळे विद्यार्थी तसेच शाळकरी मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ज्येष्ठ नागरिकांना ग्रामस्थांना सावंतवाडी येथे हेलपाटे मारत लागत होते निगुडे माजी सरपंच समीर गावडे व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी राजेश मयेकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निगुडे विशेष कार्यकारी अधिकारी पदी राजेश मयेकर यांची निवड…
