कुडाळ वॉर्ड क्र. १५ मधील आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.१०-:
कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या नोंदणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. बीएलओ श्रुती कुंभार (मधली कुंभारवाडी) यांच्या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी २ वाजल्यापर्यंत हे शिबिर संपन्न झाले. संपूर्ण दिवसभरात १०५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी
यशवंत कुंभार, गोपाळ मांजरेकर, रघुनाथ कुंभार, प्रकाश कुंभार, आनंद कुंभार, विश्वनाथ मांजरेकर, लक्ष्मी विश्वास आदी स्थानिक उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूरचे आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर, आरोसकर, आरोग्य सहाय्यक कदम, आरोग्य सेवक गट प्रवर्तक रागिणी गोसावी, दशरथ गोसावी, श्रृती कुंभार, शिल्पा कुंभार, आरोग्यसेविका गावडे, तेली यांनी उपस्थिती दर्शवली. सर्व लाभार्थ्यांनी हे शिबिर आयोजित केल्याबद्दल वॉर्ड क्र. १५ चे नगरसेवक उदय मांजरेकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page