वाफोली गावात स्वतंत्र वायरमन तात्काळ द्या…

ग्रामस्थांची मागणी:सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांच्या नेतृत्वाखाली महावितरण अभियंता एस. आर.कोहळे यांची घेतली भेट..

⚡बांदा ता.०९-: वाफोली गावात स्वतंत्र वायरमन नसल्याने विजेच्या अनेक समस्या या प्रलंबित आहेत. यासाठी स्वतंत्र वायरमन तात्काळ द्यावा. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठा होण्यासाठी गावासाठी मंजूर असलेला ट्रान्सफॉर्मर तातडीने उभरावा अशी मागणी वाफोली ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांचीभेट घेत निवेदन सादर केले.
यावेळी माजी उपसरपंच मंथन गवस, तंटामुक्त अध्यक्ष सतीश गवस, रामदास गवस, अमित कळंगुटकर, गोविंद सावंत, श्रीधर कळंगुटकर, जगन्नाथ करमळकर, विलास गवस, बंटी गवंडळकर, सुभाष परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कोहळे यांनी दोन दिवसात वायरमन देण्याचे आश्वासन दिले. तसेच गावातील वीज समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page