रोटरॅक्ट क्लब ऑफ़ बांदा तर्फे माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट….

⚡बांदा ता.०९-: रोटरॅक्ट क्लब ऑफ़ रायझिंग यूथ बांदा तर्फे माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले.
तसेच मुलांच्या क्रिडांचा देखील क्लब च्या सदस्यांनी आस्वाद घेतला.
यावेळी रोटरॅक्ट चे अध्यक्ष अक्षय मयेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार शिवम गावडे, संकेत,वेंगुर्लेकर, ईश्वरी कल्याणकर, रुपाली देसाई, कल्याणदास धुरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोटरॅक्ट क्लब दर महिन्यात प्रोजेक्ट आशय अंतर्गत एक अनाथ आश्रमास मदत करतो व सिंधुदुर्गातील सर्व आश्रमास मदत करण्याचा आमचा मानस आहे असे मत अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले

You cannot copy content of this page