आशिये सरपंच महेश गुरव यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..
⚡कणकवली ता.०९-: ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना “ब” वर्ग दर्जा देण्याकरीता सातत्याने आ.नितेश राणेंच्या माध्यमातून आशिये सरपंच महेश गुरव यांनी पाठपुरावा केला होता.त्यानुसार ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत आशिये दत्त मंदिराचा “ब” वर्गात सामावेश केल्याचा शासन निर्णय झाला आहे. आशिये दत्त मंदिराला ‘ब’वर्ग प्राप्त झाल्यामुळे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी विविध योजना आणि त्यासाठी विशेष तरतूद असल्याने चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं जाईल.त्यामुळे गावातील या दत्त मंदिरात पर्यटकांचा ओघ वाढून रोजगार निर्मिती होवून आर्थिक विकास होण्यास मदत होईल.त्यामुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आणि आ. नितेश राणे यांनी मेहनत घेत दिला शब्द पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे आशिये सरपंच महेश गुरव यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये ब वर्गात काही मोजकी मंदिरे आहेत.त्यात आमच्या आशिये दत्त मंदिराचा ब वर्गात सामवेश आहे.भविष्यात मंदीर परिसर विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार असल्याचे महेश गुरव यांनी सांगितले.
