पत्रकार परिषदेत आरोप:अशे हल्ले परतवून लावू..
सावंतवाडी ता.०९-: आंबोली रस्त्याच्या कामा मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आवाज उठवल्याने काही ठेकेदार व गाव गुंडांकून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.दरम्यान याबाबत संबंधितांना लवकरच ताब्यात घेऊन कारवाई करावी अशी मागणी देखील पोलीस अधीक्षकांकडे पोलीस निरीक्षकांनी करावी असं देखील श्री साळगावकर यांनी यावेळी सांगितले. तर असे हल्ले या आधी परतवून लावलेत. त्यामुळे मी समोरच्यांची वाट बघत आहे. आजही हल्ले परतवून लावण्याची ताकद आपल्यात आहे असं मत व्यक्त केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
