राष्ट्रवादी वैद्यकीय सेल संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रुपेश जाधव…

⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी कणकवली येथील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी रुपेश मारुती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटना प्रदेश अध्यक्ष पंडित गौतम आगा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात देण्यात आले.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेल च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रमधील सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल अशी अपेक्षा रुपेश जाधव यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

रुपेश जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली संघटना वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्यांना वैद्यकीय मदत ही फार मोठी असते एखादा आजार झाल्यानंतर उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असते. याबाबतची अनुभूती रुपेश जाधव यांनी घेतली असून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विविध ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबरच वैद्यकीय दृष्ट्या मदतीसाठी कार्यरत असल्याचे रूपे जाधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page