करिअरसाठी सावंतवाडीत या आणि आयुष्यभर सुकी रहा…

भाजपाचे विशाल परब यांचे आवाहन ; १२ रोजी जिमखाना मैदानावर सिधूरत्न जाॅब फेअरचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.०८-: करिअरसाठी सावंतवाडीत या आणि आयुष्यभर सुकी रहा कारण भाजपाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून १२ जानेवारीला जिमखाना मैदानावर सिधुरत्न जाॅब फेअर चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील १०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत त्यामुळे जो जाॅब फेअर येईल त्यांचे नशीब बदलून जाईल असे आवाहन श्री परब यांनी केले आहे.

जिमखाना मैदानावर दिवसभर या जाॅब फेअरचे आयोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी प्राधान्य असून निवड न झालेल्यांना जाॅब कार्डचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे संधी मिळाली आहेच तर लाभ घ्या आणि आपले भवितव्य उज्वल करा असे आवाहन विशाल परब यांच्या माध्यमातून तरुण तरुणींना करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page