⚡सावंतवाडी ता.०८-: नोकऱ्यांच कमी होणार प्रमाण पाहता भविष्यात उद्योगाची कास धरल्याविना तरणोपाय नाही. यासाठी
मराठा समाजाची उद्योग व व्यवसाय शाखा सुरू केली आहे. याच जिल्हाध्यक्षपद पुंडलिक दळवी यांना देण्यात आल आहे.
दरम्यान ते गेली अनेक वर्षे उद्योग व व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनुभवी असल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. पुंडलिक दळवी यांच पुष्पगुच्छ देऊन यावेळी समाजबांधवांनी अभिनंदन केलं.
याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत, मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, नवनिर्वाचित उद्योग शाखा जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत, संजय लाड, राजन म्हापसेकर, श्री. राणे आदी उपस्थित होते.
