अनियमित पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांची बांदा ग्रामपंचायतला धडक…

साईप्रसाद काणेकर यांचे नेतृत्व:: दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करू; सरपंच प्रियांका नाईक यांच्या आश्वासन..

⚡बांदा ता.०८-: बांदा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत धडक दिली. सरपंच प्रियांका नाईक यांनी तांत्रिक अडचण असून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले तसेच नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्री काणेकर यांच्या नेतृत्वाखाली निखिल मयेकर, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, नंदू बांदेकर, विजय बांदेकर, सौ. मिलन आजगावकर, प्रवण कोचरेकर, मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page