⚡मालवण ता.०८-: दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या मालवण तालुक्यातील बौद्ध बांधवांची मालवण समाज मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विद्याधर धोंडु कदम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली .या बैठकीत मालवण तालुका अध्यक्षपदी सिध्दार्थ मनोहर जाधव यांची तर महासचिवपदी गंगाधर भिमराव कदम यांची निवड करण्यात आली
यावेळी मालवण तालुका कार्यकारिणी बनवायचे कामी निरीक्षक म्हणून जिल्हा संस्कार विभाग प्रमुख सुर्यकांत बिबवणेकर गुरुजी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी संस्थेची माहिती देताना संस्थेची कार्यप्रणाली सांगितली. तर संस्कार विभाग प्रमुख व निरीक्षक सुर्यकांत बिबवणेकर गुरुजी यांनी सर्व पदांची जबाबदारी काय आहे, पदाधिकारी यांनी पद घेतल्यानंतर कसे आचरण ठेवले पाहिजे याबाबत माहिती देऊन मालवण तालुका कार्यकारिणी घोषित केली.
मालवण तालुका अध्यक्षपदी सिध्दार्थ मनोहर जाधव, उपाध्यक्ष दुलाजी चौकेकर ( चौके माजी पोलीस पाटील) महासचिव गंगाधर भिमराव कदम ( कांदळगाव ) संस्कार विभाग प्रमुख म्हणून विधी संचालक संदेश डिकवलकर ( डिकवल ), कोषाध्यक्ष विलास नाईक ( धामापूर ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेचे सभासद मा. पी. के. चौकेकर, जिल्हा सावंतवाडी संघटक आयु. चंद्रकांत जाधव ,कुडाळ संघटक आयु. विष्णु अणावकर, आयु.बबन पेंडुरकर, नाना उर्फ नरेंद्र पेंडुरकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आनंद मालवणकर, मावळते प्रभारी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर, सचिव बबन मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पी. के. चौकेकर यांनी नूतन कार्यकारिणीला मार्गदर्शन केले तर चंद्रकांत जाधव,आनंद मालवणकर यांनी, शुभेच्छा देवून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बबन मालवणकर यांनी केले. आभार ॲड. सुमित जाधव यांनी मांडले.
बैठकीला विष्णू चौकेकर, अनंत चौकेकर, दादू चौकेकर, नामदेव चौकेकर, परुळेकर,अजित जाधव,परेश मालवणकर ,हेमंत वायंगणकर, धामापूरकर, संतोष मालवणकर उपस्थित होते.
