हुमरमळा रामेश्वर विद्यामंदिर शाळेसाठी २० लाख रुपयांच्या निधी देणार…

आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन:सरपंच अमृत देसाई यांची माहिती..

⚡कुडाळ ता.०८-: स्थानिक ग्रामस्थांच्या मेहनतीने उभ्या राहिलेल्या रामेश्वर विद्यामंदिर जि. प. शाळेची पक्की इमारत व्हावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वी पालकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती पालकांच्या बैठकीत हुमरमळा-वालावल सरपंच अमृत देसाई यांनी दिली.
हुमरमळा रामेश्वर विद्या मंदिर शाळेत पालकांची बैठक सरपंच देसाई आणि अतुल बंगे यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी पालकांनीही शाळा पुढील पावसाळा येण्याअगोदर पूर्ण होण्यासाठी आग्रह धरुन आमदार नाईक यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पुन्हा एकदा विनंती करण्याचे ठरले. यावेळी देसाई यांनी मोबाईलद्वारे आमदार नाईक यांच्याशी संपर्क साधून शाळेसाठी निधी किमान २० लाख देण्याची विनंती केली. त्यानुसार आमदार नाईक यांनी येत्या महिन्याभरात २० लाख रुपयांचा निधी देण्याची हमी दिली. यावेळी पालकांच्या बैठकीत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव, पालक संघाच्या अध्यक्षा ताम्हणेकर, उपाध्यक्षा वालावलकर, पालक भरत परब, आबा कंद्रेकर, दत्ता गुंजकर, पांडुरंग सावंत, राजन कंद्रेकर, जेष्ठ ग्रामस्थ शरद वालावलकर, नाथा ताम्हणेकर, निलेश परब, दीपा गुंजकर व मुख्याध्यापिका फणसेकर, शिक्षिका गोसावी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page