बांदा शहरात ५ एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक…

दुपारची घटना:काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त…

⚡बांदा ता.०८-: बांदा शहरात देऊळवाडी भरडाला आज दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे ५ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

आज दुपारी अचानक आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी नजीक वस्ती नसल्याने सुरुवातीला आग लागल्याचे लक्षात आले नाही. दुपार असल्याने व वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये तुकाराम मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, प्रमिला मोरजकर, सुंदर सावळ यांची काजू बागायती जळून खाक झाली. तसेच सागवान, जांभूळ झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने सायंकाळी उशिरा आग विझवली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
फोटो :-
आगीत जळून खाक झालेली बागायती. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page