⚡कणकवली ता.०८-: त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या.मालवण या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते वामन तर्फे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण तज्ञ, उत्कृष्ट प्रशासक गुरुवर्य वि.न.नाबर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनसेवा निधी बांदा आणि गुरुवर्य वि.न.नाबर समिती, बांदा यांच्या वतीने दिला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार बांदा येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मापुर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा अकादमीचे अध्यक्ष, सेवा निवृत्त प्राचार्य अनिल सामंत उपस्थित होते.गेल्या ३५वर्षा पासून थोर समाजसेवक डॉ.कै.दि.भ खानोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व समाजसेवक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यावर्षीचा आदर्श प्रशासक व मुख्याध्यापक पुरस्कार गेली २५वर्षे मुख्याध्यापक म्हणून शैक्षणिक आणि प्रशासकीय काम करताना सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक संघटनात्मक कार्यात नेहमीच प्रेरणादायी काम करणाऱ्या वामन तर्फे यांना हा पुरस्कार देण्यात आला.आपण कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन विनाअनुदानित शाळेत नोकरीची सुरुवात करुन शाळेची शैक्षणिक प्रगती करताना शाळेच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी आपण संस्था, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कसे प्रयत्न केले या बाबत आपल्या मनोगतुन माहिती देताना हा पुरस्कार विद्यार्थी, संस्था, शाळा, हितचिंतक,कुटुंबिय, अडचणीत मदत करणारे नातेवाईक, सहकारी, संघटनात्मक कार्यातील गुरु यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.यावेळी जनसेवा निधी बांदाचे सचिव डॉ.मिलिंद खानोलकर, श्री.नार्वेकर , श्री.तर्फे यांचे संघटनात्मक कार्यातील गुरु श्री.मातोंडकर , शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर, रामचंद्र घावरे, प्रदिप शिंदे, श्री.जाधव , श्री.सराफदार , श्री.देसाई, श्री. सुशांत पाटील , अंकुश वळंजू , श्री.फडके , सुभाष सावंत , विष्णु काणेकर ,अरुण सावंत, भालचंद्र जोईल, संजय तर्फे, राजेंद्र सावंत,सौ.विनया तर्फे,सौ.भाग्यश्री जोईल,सौ.अपुर्वा सावंत व अनेक मान्यवर उपस्थित होते.
