⚡बांदा ता.०८-:
अवघ्या तीन आठवड्यात पत्नी पाठोपाठ पतीचेही निधन झाल्याची दुर्दैवी घटना पाडलोस केणीवाडा येथे घडली. विशेष म्हणजे दोघांचेही निधन एकाच दिवशी झाले. केणीवाडा येथील नाना शंकर परब (वय 80) यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. जाणकार दाम्पत्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नी सई परब यांचे तीन आठवड्यापूर्वी निधन झाले. या दुःखातून परब कुटुंब सावरत असताना नाना यांचा देहांतवास झाला. नाना यांची भजनातील गौळण गायनात विशेष खासियत होती. काल रविवारी रात्री गायलेली गौळण अखेरची ठरली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, भाऊ, विवाहित मुलगी, जावई, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब व कृष्णा परब यांचे ते वडील होत.
