महिला बचतगटांसाठी स्वतंत्र कार्यालय बांधून देणार

काळसे सरपंच केशव सावंत

*💫मालवण-:*  ” महिला सक्षमीकरण हाच महिला दिनाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामपंचायती मार्फत राबविल्या जाणाऱ्या महिलांसाठीच्या योजना थेट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार. काळसे गावातील महिला बचत गटांनी एकत्र येउन शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग ही उल्लेखनीय बाब आहे” असे प्रतिपादन काळसे सरपंच केशव सावंत यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले तसेच महिला बचतगटांसाठी येत्या दोन महिन्यात स्वतंत्र कार्यालय बांधून देणार असे आश्वासनही यावेळी केशव सावंत यांनी यावेळी दिले.          ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता राजकन्या ग्रामसंघ काळसे यांच्यावतीने बुधवार दिनांक १० मार्च रोजी गावातील सर्व बचतगटातील महिलांचा महिला मेळावा काळसे येथे आयोजित करण्यात आला होता.  यावेळी काळसे सरपंच केशव सावंत, ग्रामपंचायत सदस्या दिव्या परब ग्रामसेवक पी. आर. निकम ,  प्रभाग समन्वयक प्रिया धर्णे , क्लस्टर कोऑर्डीनेटर समीर ठाकूर , प्रभाग अध्यक्षा दीपिका म्हापणकर, अंकिता पाटकर, सी. आर. पी. साक्षी परब , वैभवी म्हापणकर माजी सरपंच भावना मेस्त्री  आदी मान्यवर आणि राजमाता राजकन्या ग्रामसंघाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. दिपीका म्हापणकर यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.           त्याचप्रमाणे समीर ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि महिलांनी शिक्षण कमी असल्यास न्यूनगंड बाळगू नये अशिक्षित महिलाही इतिहास घडवू शकतात. ग्रामसंघ कळस असेल तर बचतगट हे त्याचे खांब आहेत. त्यामुळे जो टिकून राहणार त्याचा नक्की फायदा होणार.”  तसेच यावेळी माजी सरपंच भावना मेस्त्री यांनी महिला दिन का व कधीपासून साजरा केला जातो तसेच त्याचे महत्व काय याबद्दल सविस्तर माहीती दिली. आणि सौ. काळसेकर यांनी आईचे महत्व सांगणारे गीत सादर केले. प्रभाग समन्वयक प्रिया धर्णे यांनीही बहुमोल मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले.    

You cannot copy content of this page