जय प्रकाश चौक येथील घटना
*💫सावंतवाडी दि.१७-:* भरधाव वेगाने येणाऱ्या धुमस्टाईल दुचाकी स्वाराने जयप्रकाश चौक येथे एका रिक्षाला जोरदार धडक दिली असून, या अपघातात रिक्षा पलटी झाली आहे. या रिक्षा मधून दोन मुल प्रवास करत होती. सुदैवाने त्या दोन्ही मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आहे. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी या प्रवाशांना तात्काळ रिक्षाच्या बाहेर काढले. दरम्यान, हा दुचाकीस्वार अरेरावी करत रिक्षाचालकाच्या अंगावर गेला असता संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या युवकाला चोप दिला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
