वाभवे – वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाने अक्षता जैतापकर यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी-: वैभव साबळे…

*💫वैभववाडी दि.१७-:* वाभवे – वैभववाडी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांच्या उपोषणाची दखल घेऊन मंगळवारी 16 मार्च रोजी नगरविकास जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांनी वाभवे- वैभववाडी नगरपंचायत च्या नगरसेवकांची बैठक घेऊन माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून सर्व कामे मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे अशा सूचना साबळे यांनी केली. प्रलंबित मागण्यामध्ये पाणी टंचाई भासू नये म्हणून सुख नदी पत्रामध्ये सण 2019 – 20 मध्ये वनराई बंधारा बांधला.त्या कामासाठी टॅक्टर व जेसीबी लावला त्यासाठी 9 हजार रुपये खर्च झाले.ते बिल नगर पंचायतीने संबंधित ठेकेदाराला अदा करावे,महाराणा कला दालन हे नगर पंचयचायती च्या हद्दीतील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी मोटार पंपाने पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यासंबंधि वाभवे – वैभववाडी नगरपंचायती मार्फत प्रशासकीय ठराव करणेत यावा अशा सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या. वैभववाडी काँग्रेस महिला अध्यक्ष मीनाताई बोडके यांनी अनधिकृत स्टॉलचा बाबत विचारणा केली. या वाबत स्टॉलचा सर्व्हे करण्यात येणार आहे.अनधिकृत असलेल्या स्टॉलधारकांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे .महाराणा प्रताप कलादालनासाठी एक कर्मचारी नगर पंचयचायती मार्फत देण्यात यावा,कलादालनाची देखभाल करावी ,नगर पंचयचायती च्या कर्मचाऱ्यांनी जनतेशी चांगले वर्तन ठेवावे अशा सूचना माजी सभापती तथा वैभववाडी तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष मीनाताई बोडके यांनी मांडल्या.लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून सर्व मागण्यांची पूर्तता केली. यावेळी माजी नगराध्यक्षा तथा नगरसेवक अक्षता जैतापकर,वैभववाडी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मीनाताई बोडके ,नगरसेवक संतोष माईनकर,मुख्याधिकारी सुरज कांबळे आदी उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page