हिंदू जनजागृती समितीचे निवेदन
*💫मालवण दि.१७-:* होळी आणि रंगपंचमीनिमित्त गैरप्रकारांना होणाऱ्या आळा घालण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समितीने मालवणचे निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे तसेच नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अशोक ओटवणेकर, मधुसूदन सारंग, मंगेश शेर्लेकर, शिवाजी देसाई, सागर चव्हाण, प्रार्थना चव्हाण आदी उपस्थित होते. हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडविणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, त्यांच्यावर घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे तसेच आरोग्याला घातक असणारे रंग किंवा डॉबर फासणे, अंडी फेकून मारणे आदी अपप्रकार रोखण्यात यावेत. रासायनिक रंग विक्री करणाऱ्यावर कारवाई करून होळी सणाचे पावित्र्य राखावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
