गुणवंत खेळाडू पेंशन योजना सुरु

केंद्र सरकारची योजना

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 17 : ऑलिंम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक गेम्समधअये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने गुणवंत खेळाडू पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिंक गेम्प प्राविण्यधारक खेळाडूंना दरमहा 20 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. याशिवाय ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धात समवाशिष्ट असलेले खेळ प्रकारात सुवर्ण पदक घेतलेल्या खेळाडूंना 16 हजार रुपये, रैप्य व कास्य पदक घेतलेल्या खेळाडूंना 14 हजार रुपये, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियायी स्पर्धा व पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना 14 हजार रुपये आणि रौप्य व कास्य पदक घेतलेल्यांना 12 हजार रुपये दरमहा मानधन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा, त्यांने ऑलिंम्पिक, पॅरा ऑलिंम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केलेले असावे. खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झालेले असावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page