सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब याचा उपक्रम
*💫सावंतवाडी दि.१७-:* भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक उदय नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, अमित गंवडळकर, दिलीप भालेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, परिक्षीत मांजरेकर, महेश पांचाळ, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
