भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
*💫बांदा दि.१७* येथे आज माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रमोद कामत, प्रभारी सभापती शीतल राऊळ, मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा परिषद सदयस स्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच अक्रम खान, शहर अध्यक्ष राजा सावंत, युवा बांदा मंडल अध्यक्ष मकरंद तोरस्कर, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, बांदा प्रभारी दादू कविटकर, महिला अध्यक्ष अवंती पंडित, ग्रामपंचायत सदस्य किशोरी बांदेकर, अंकिता देसाई, तालुका सचिव मधू देसाई , प्रवीण देसाई, जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव , दीपक सावंत , वाघराज बांदेकर, दीपक बांदेकर व वार्ड सर्व प्रमुख पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन नयनेश्वर सावंत व युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी केले होते . यावेळी सर्व पदधिकारी यांनी आपले विचार प्रगट करत माजी खासदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी केले यावेळी प्रभारी सभापती पदी निवड झाल्याबद्दल शीतल राऊळ व अबकस मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेली युगदा दीपक बांदेकर यांचा प्रमोद भाई कामत यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
