राजकारणात मैत्री जपणारा व कार्यकर्त्यांना कणा मानणारा अशी आहे ओळख ;वाढदिवसानिमित्त नीलेश राणेंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
*💫सावंतवाडी दि.१७-:* कार्यकर्ता हा कणा मानून नेहमी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हाकेला धाऊन जाण्याची कुवत ठेवणारा नेता म्हणून भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची कोकणच्या राजकारणात ओळख प्राप्त आहे . राजकारणात कार्यकर्त्यांशी मैत्रीचे संबंध जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना पाहिले जाते .राजकारणापलीकडेही दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून डॉ. निलेश राणे यांची एक वेगळी ओळख आहे . त्यामुळे अल्पावधीतच डॉ. निलेश राणे यांनी राजकिय वर्तुळात प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. कोकणचा आतापर्यंतचा युवा खासदार म्हणून देशभरात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या काळात देशाच्या संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहात त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने विविध विकासात्मक बाबी मांडून सिंधुदुर्गचा आणि पर्यायाने कोकणचा ठसा उमटविला आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन ते आज आपले राजकीय कार्य करीत आहेत. कोकणी माणसाचा विकास झाला पाहिजे , प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे हीच भावना त्यांनी सदोदित ठेवली आहे. कोंकणावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ दे डॉ. निलेश राणे नेहमीच मदतीसाठी सर्वात आधी पुढे असतात . फयान वादळ असो अथवा महापूर डॉ. राणे यांनी संकटांच्या काळात केलेली मदत नक्कीच विसरण्याजोगी नाही . आपल्या खासदारकीच्या काळात त्यांनी जिल्ह्याच्या आणि आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अनेक विकासकामे केली . त्यातीलच एक काम झाराप ते पत्रादेवी बायपासचे म्हणावे लागेल. रेल्वे विभागाकडून कामे करून घेण्यासाठी प्रसंगी त्यांनी आंदोलनही केले .आणि त्या आंदोलनाच्या जोरावर ठरवलेले विकासाचे इप्सित साध्यही केले. राज्याच्या राजकारणात महत्वाकांक्षी आणि आक्रमक नेता म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना ओळखले जाते .त्यांची तीच आक्रमकता डॉ. निलेश राणे यांनी आत्मसात केली आहे.विरोधकांवर त्यांनी केलेला प्रहार नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अशा या कणखर, बाणेदार, सच्चा नेत्यास ग्लोबल महाराष्ट्र कडून जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
