दुचाकीस्वारांने धडक दिल्याने युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत गंभीर जख्मी

*अन्य दोन दुचाकीस्वारांना देखील धडक;पोलिस घटनास्थळी दाखल*

*सावंतवाडी : दि.१६ :* रस्ता ओलांडताना शहरातील युवकांनी दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पडवे येथील लाईफ टाईम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना आज रात्री उशिरा ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी त्या दुचाकी स्वाराने तेथे उभ्या असलेल्या अन्य दोन दुचाकीस्वारांना देखील धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. ठोकर देणारे ते युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा आहे.

You cannot copy content of this page