तिलारी ते तेरवण मेढे रस्त्याच्या कामाला सुरुवात वाहन चालकांतून समाधान…

दोडामार्ग, दि-२८:- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील तिराळी ते तेरवण मेढे हा रस्ता पूर्ण पणे खड्डेमय झाला होता. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वेळी या रस्त्यावर अपघात घडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

हा रस्ता व्हावा यासाठी राजकीय पदाधिकऱ्यांकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यां कडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने वाहन चालकां मधून समाधान व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page