काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत केला सन्मान

⚡कणकवली ता.२९-: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आम. हुस्नबानू खलीफे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान सोहळा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आयोजित केला.

कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे, कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव यांना सी. आर. चव्हाण यांच्या हस्ते भाऊ डगरे , निलेश मालंडकर , आनंद विठोबा नाईक यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते
सुनिल काणेकर यांना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोक्टेशनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यावेळी काँग्रेसच्यावतीने हा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. तसेच सन्मान मुर्तीना आपल्या विभागात पक्षाचे कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळावी, आणि पक्ष जोमाने वाढवावा, तसेच तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा केंद्रात जाऊन महाराष्ट्र शासनाच्या मंत्री महोदयांच्या वाहनाचे सारथी होण्याचे भाग्य लाभलेल्या प्रथम महिला पोलीस दलातील भगिनीचा सन्मान केला होता, असे प्रतिपादन राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले,

यावेळी सी. आर. चव्हाण म्हणाले, मित्र पक्ष या नात्याने तसेच जाधव निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते असल्याने त्यांचा सन्मान करताना आनंद होत आहे,
श्री.जाधव म्हणाले, राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज ४० वर्ष पक्षाची निस्वार्थी सेवा केलेली असुन मागील ३ वर्ष त्यांनी जो वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीमत्त्वामचा सत्कार, सन्मान करत आहेत, तो उपक्रम खरोखरच एक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरेल आणि पक्ष या त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन, त्यांना अपेक्षित सन्मान देईल,यावेळी प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये, सरचिटणीस राजु वर्णे व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र, व्यापारी मित्र मंडळ व शालेय ,ॐ नमो भगवते भालचंद्राय या सर्व मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page