केतन सावंत विद्यार्थी सेनेचे नवे जिल्हाध्यक्ष: अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र..
⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पदावरून आशिष सुभेदार यांची आज उचलबांगडी करण्यात आली असून या जागी केतन सावंत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र आज अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
विद्यार्थी सेना अध्यक्ष मा. जिल्ह्यात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी प्रेरणादायी काम करण्यात येणार असून लवकरच मा. अमित ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी पक्ष निरीक्षक मा. संदीप दळवी ,मा. गजानन राणे ,जिल्हा संपर्क अध्यक्ष. महेश परब व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान नवनियुक्त विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ ,तालुका अध्यक्ष. मिलिंद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.
