शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार: समितीच्या सदस्य पदी वीस वर्ष होते कार्यरत
⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर यांची निवड झाली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ व हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान श्री नाटेकर हे यापूर्वी या समितीच्या सदस्यपदी २० वर्ष कार्यरत होते. त्यांच्या एकंदरीत कामकाज अनुभवावरून त्यांची अध्यक्षपदी पून्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन देखील होत आहे.
या समितीवर महादेव उर्फ संजू पांगम, शिवानी दिनेश पाटकर, सौ. प्रांजल प्रशांत जाधव, श्री शंकर संभाजी साळगावकर, श्री विनोद सुखदेव सावंत ,श्री संजय बाबुराव देसाई ,श्री साबाजी देऊ धुरी ,श्री सत्तार महंमद पटेल ,व शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, सचिव तहसीलदार श्रीधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून ही
समिती गठित करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे माजी नगराध्यक्ष अनोरजीन लोबो, महिला शहर प्रमुख भारती मोरे, शुभांगी सुकी दिपाली सावंत शर्वरी धारगळकर, शिल्पा सावंत, नंदू शिरोडकर महादेव राऊळ आदी उपस्थित होते
