हुंबरठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात…

घाटकोपर येथील कारचालक ठार तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी..

⚡कणकवली ता.२८-: मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजीक हुंबरठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला असून
घाटकोपर – मुंबई येथून गोव्याला जाणाऱ्या भरधाव वेगातील वॅगनर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर धडकली. या अपघातात कारचालक प्रविण सुंदर शेट्टी (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रविण यांची पत्नी काव्याश्री प्रविण शेट्टी (३५), मुलगी आर्वी प्रविण शेट्टी (९) व सिद्धेश भाऊसाहेब सटाले (३०. सर्व रा. मुंबई) यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

हा अपघात हुंबरठ येथील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता सुमारास झाला.
अपघातानंतर जखमींना येथून जात असलेल्या चेतन ताम्हाणेकर यांनी आपल्या वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. जखमीना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, इतर वाहन चालक, कणकवली पोलिस, महामार्ग पोलिस, वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिस शिपाई किरण मेथे, वाहतूक पोलिस हवालदार विनोद चव्हाण, होमगार्ड तसेच महामार्ग पोलिस आशिष जाधव, सावकार वावरे, दत्ता कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तत्काळ खासगी वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर, डॉ. स्नेहा वसईकर, डॉ. अजय शेळके, डॉ. शालू गुप्ता, परिचारिका वैभवी जाधव, सायली तीवरेकर, शिल्पा परब, पायल मोरये, छाया हजारे, सुरक्षारक्षक सावंत आदींनी जखमींवर तत्काळ उपचार केले.

You cannot copy content of this page