⚡सावंतवाडी ता.२८- : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे धडाडीचे युवा नेतृत्व व वैश्य समाजाचे युवा संघटक समीर वंजारी हे आत्ताच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह पतसंस्था मर्यादित फोंडाघाटचे संचालक म्हणून माणगाव खोरे, सावंतवाडी तालुका व दोडामार्ग तालुका यातून निवडून आले आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
ह्या क्षेत्रामध्ये ते आपला खास ठसा उमटवतील यामध्ये कोणतीही शंका नाही, असे त्यांच्या न्याती बांधवातून बोलले जात आहे.
