नाथ पै एकांकिकेच्या खुल्या गटाचा निकाल जाहीर..
⚡कणकवली ता.२८-: वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान आयोजित ४६ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेतील खुल्या गटात मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणेच्या ‘सिनेमा’ने प्रथम क्रमांक पटकाविला. गायन समाज देवल क्लब, कोल्हापूरच्या ‘बीईंग अँड नथिंग’ ने द्वितीय तर ढ मंडळी कुडाळच्या ‘डीम टँग डीटँग’ने तृतीय क्रमांक पटकाविला.
खुल्या गटातील उर्वरित निकालपुढीलप्रमाणे: दिग्दर्शक १. अभिप्राय कामठे (सिनेमा, मराठवाडा मित्रमंडळ, वाणिज्य महाविद्यालय, पुणे), २. अनुपम दाभाडे (बिईंग अँड नथिंग, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर) ३. विठ्ठल तळवलकर (डीम टँग डीटँग, ढ मंडळी, कुडाळ) तांत्रिक अंगे: १. मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणेची सिनेमा, २. ढ मंडळ कुडाळची डीम टँग डीटँग, ३. गायन समाज देवल क्लब, कोल्हापूरची बिईंग अँड नथिंग.
अभियन पुरुषमध्ये १. श्रेयस जोशी (सिनेमा, भूमिका-वडील) २. आरव आईर (डीम टँग डीटँग, भूमिका-गोपी), ३. प्रथमेश केरकर (अमर अमृता, भूमिका- अमर), उत्तेजनार्थ गौरव पाटील (संपर्क क्रमांक, भूमिका निरंजन), भारत खोत (संपर्क क्रमांक, भूमिका-निर्झर), तेजस म्हस्के (डीम टँग डीटँग, भूमिका-दारुडा).
अभियन स्त्रीमध्ये १. राजश्री जमदाडे (इंटरॉगेशन, भूमिका-मुलगी), २. श्रृती मोहिते (बिईंग टँग नथिंग, भूमिका सुजन), ३. डॉ. यशश्री कंटक (संपर्क क्रमांक, भूमिका-सारिका). उत्तेजनार्थ – अंकिता डिंगणकर (हॅपी फादर्स डे, भूमिका-लक्ष्मी), रितिका मिने (बिईंग अँड नथिंग, भूमिका रँना), मुग्धा भोसले (सिनेमा, भूमिका- आई), श्वेता सावंत (डीम टँग डीटँग, भूमिका गोकुळा). मामा वरवडेकर लेखन केले.
