नाथ पै एकांकिकेच्या शालेय गटात शिरगाव हायस्कूलची ‘आभाळ’ प्रथम…

⚡कणकवली ता.२८-: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित 46 व्या नाथ पै नाटक स्पर्धेत शिरगाव हायस्कूलच्या ‘आभाळ’ने प्रथम, कोल्हापूरच्या शिंदे अकादमीच्या ‘अस्तित्व’ने द्वितीय तर गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘राखेतून उडाला मोर’ने तृतीय क्रमांक पटकावला.

शालेय गटाचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : दिग्दर्शन- १. डॉ. राजेंद्र चव्हाण (शिरगाव हायस्कूल, ‘आभाळ’), २. सुनील शिंदे (शिंदे अँकॅडमी कोल्हापूर, ‘अस्तित्व’), ३. आसीफ दत्तगीर सनवे (गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, ‘राखेतून उडाला मोर’). तांत्रिक अंगे- १. शिरगाव हायस्कूलची ‘आभाळ’, २. गायन समाज देवल क्लब कोल्हापूरची ‘राखेतून उडाला मोर’, ३. शिंदे अॅकॅडमी कोल्हापूरची ‘अस्तित्व’.

अभिनय : पुरुष १. जशिथ संदीप साटम (‘आभाळ’, भूमिका संत्या), २. आयुष उडागड्डे (‘अस्तिव’, भूमिका मधू), ३. धृव सावनुरे (‘राखेतून उडाला मोर’, भूमिका निवथा). स्त्री- १. जिजा बालकर (‘अस्तित्व’, भूमिका चिमणी), २. अमृता पवार (‘आभाळ, भूमिका आजी), ३. त्रिवेणी ठाकुर- देसाई (‘राखेतून उडाला मोरे’, भूमिका-रखी) उत्तेजनार्थ भार्गवी केळुसकर (विद्यामंदिर प्रशाला, ‘आऊट ऑफ कंट्रोल’), शुभ्रा जडथे (बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ, ‘पुतळे झाली माणसे’), भाग्यश्री पाटील (कुडाळ हायस्कूल, ‘देवाची फुले’), वेदिका कुडाळकर (आरती प्रभू कला अकादमी कुडाळ, ‘घुसमट’), भाग्यश्री सूर्यवंशी (शिंदे अँकॅडमी कोल्हापूर, ‘अस्तित्व’). परीक्षण डॉ. सतीश साळुंखे, सुहास भोळे, अनिल कांबळे यांनी केले.

You cannot copy content of this page