सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांचाकुडाळ नेहरुनगर येथे गोळीबार सराव…

⚡कुडाळ ता.२७-: सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांचा गोळीबार सराव
आज, २७ डिसेंबर २०२३ पासून ते १० जानेवारी २०२४ रोजीपर्यंत कुडाळ नेहरुनगर (बाव) येथे फायरिंग बट येथे होणार आहे. त्यामुळे कुडाळ नेहरुनगर (बाव), फायरिंग बटच्या नजीकच्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत सकाळी ६.३० ते दुपारी २.०० या वेळेच्या मुदतीत गोळीबार सराव सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने फायरिंग बटच्या ठिकाणी आणि परिसरात मनुष्य, प्राणी वगैरे सदर मैदान तसेच आजूबाजूच्या परिसरात प्रवेश करणार नाहीत याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन कुडाळ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी केले आहे.

You cannot copy content of this page