⚡कणकवली ता.२७-: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा विशेष निमंत्रित नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नियोजन विभागाचे उपसचिव नितीन खेडकर यांनी निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार असून अबिद नाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. अबीद नाईक यांच्यासह काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रीक , सावळाराम अणावकर यांचीही जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी वर्णी लागली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक….
