युवकांच्या व महिलांच्या उद्योगांना वाव देण्याचा सामाजिक बांधिलकीने घेतलेला पुढाकार स्तुत्य…

राजन पोकळे: मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 110 कोटीची विकास कामे सुरू; सुंदरवाडी मिनी महोत्सवचे शानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडीतील युवकांच्या व महिलांच्या उद्योगांना वाव देण्याचे काम सामाजिक बांधिलकीने केले, आणि त्यांनी घेतलेला पुढाकार अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे केले.

दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात गेल्या वर्षभरात 110 कोटी पेक्षा जास्त विकास काम सुरु आहेत. त्यामुळे एक वेगळे स्वरूप सावंतवाडीला गेल्या 25 वर्षात मिळाल ते असंच यापुढे देखील सुरू राहील असही देखील पोकळे म्हणाले.येथील दीपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सामाजिक बांधिलकी इनरव्हील व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदरवाडी मिनी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी श्री पोकळे हे उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंके, माजी नगराध्यक्ष अनोरजीन लोबो, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेवक तानाजी पाटील, माजी नगरसेवीका, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर, रिया रेडीज, प्रविण भागवे, नंदू शिरोडकर, समीरा खलिप आदी उपस्थित होते.

यावेळी पोकळे पुढे बोलताना म्हणाले की, 2017 मध्ये सावंतवाडी पर्यटन महोत्सव झाला होता. परंतु गेले अनेक वर्ष हा महोत्सव काही कारणास्तव होऊ शकला नाही, परंतु आपण अपेक्षा करू की पुढील 2024 मधील तरी हा पर्यटन महोत्सव होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान या मिनी महोत्सवाच्या माध्यमातून पुढील पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून त्यामुळे सावंतवाडीकरांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील पोकळे यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page