नट वाचनालयात २७ जानेवारीला निबंध स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात २७ जानेवारी रोजी अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


सकाळी १०.३० वाजता ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे. पहिला गट इ.५ वी ते ७ वी व दुसरा गट इ. ८ वी ते १० वी असा आहे. लहान गटासाठी ‘माझ्या गावचे वाचनालय,’ ‘माझा आवडता संत’ हे विषय असून वेळ १ तास ठेवण्यात आला आहे. यासाठी शब्द मर्यादा ५०० आहे. मोठ्या गटासाठी ‘भारताचे चांद्रयान मिशन’, ‘वाचनालय एक संस्कार केंद्र’ हे विषय असून यासाठी वेळ १ तास ठेवण्यात आला आहे. शब्दमर्यादा ७०० शब्द आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित राहील. ही स्पर्धा वाचनालयात होणार आहे.
स्पर्धकांनी व स्पर्धक शाळांनी आपली नावे वाचनालयात बुधवार दि. २४ जानेवारी पर्यंत आणून द्यावीत. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page