२९, ३० डिसेंबरला रक्त व शुगर तपासणी शिबिर…

बांदा मराठा, आस्था लॅब यांचा संयुक्त उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
बांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन 29 व 30 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत मातृत्व मेडिकल स्टोअर्स, काळसेवाडी,बांदा येथे करण्यात आले आहे. सदर शिबिर सर्वांसाठी मोफत आहे. या शिबिरामध्ये डॉ. चेतना गावकर या रुग्णांना मार्गदर्शन व सल्ला देणार आहेत.
सदर शिबिरात रक्त सीबीसी मधील ११ टेस्ट हिमोग्लोबिन, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट, रक्तातील साखरेचे प्रमाण, वजन, उंची, बी. एम. आय, ब्लड प्रेशर तपासणी करून रुग्णांना डॉक्टर मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर तपासणी ही सर्वांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
बांदा मराठा समाजामार्फत गेली आठ वर्ष अनेक नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व रुग्णांसाठी अशा प्रकारचे मोफत तपासणी शिबिर प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब व सचिव आनंद वसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page