असरोंडी श्री लिंगेश्वर पावणादेवीचा 30 डिसेंबरला जत्रोत्सव…

⚡कणकवली ता.२७-: असरोंडी गावची आराध्य व जागृत ग्रामदेवता असरोंडी श्री लिंगेश्वर पावाणदेवीची वार्षिक जत्रा मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शनिवार 30 डिसेंबर 2023 रोजी श्री पावणादेवी मंदिर येथे होणार आहे.
गुरूवार 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वा देव राठीसह श्री लिंगेश्वर देवालय येथे भेटीला जाणार आहेत. तेथून शुक्रवार 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. देव राठीसह सर्व ग्रामदेवतांना भेटी देत गाव प्रदक्षणा करून श्री पावाणादेवी मंदिरात पोहचणार आहेत. त्यानंतर शनिवार 30 डिसेंबर रोजी सर्व धार्मिक कार्यक्रम होऊन ओट्या भरणेचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 11 वा चेंदवणकर गोरे दशावतार मंडळ कवठी यांचे नाटक होणार आहे. या आराध्य व जागृत श्री पावणादेवी जत्रेस मुंबईस्थित नागरिक व जिल्ह्यातील अनेक भाविक उपस्थित राहतात. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहण देवस्थान समिती तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page