बांदा वाफोली रस्ता खड्डेमय झाल्याने उद्या संजय आईर यांच रस्त्याच्या लगतच बेमुदत उपोषण…

⚡बांदा ता.२६-: बांदा वाफोली रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक २७ रोजी रस्त्याच्या लगतच बेमुदत उपोषण छेडण्यात येणार आहे. यासंदर्भात बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, बांदा वाफोली ग्रामीण मार्ग हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची दुर्दशा झाली असून ठिकठिकाणी चाळण झाली आहे. पाटकर बागेजवळ पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत घालून किमान १ मिटर भराव घालणे आवश्यक आहे. या कामासाठी ४० लाख रुपये तसेच रस्त्याच्या मजबुतीकारणासाठी ६० लाख असा १ कोटी रुपये निधी अपेक्षित आहे.
मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने यासाठी केवळ २० लाख रुपये निधी मंजूर असल्याचे लेखी कळविले आहे. या निधीतून केवळ ७०० मिटर रस्त्याचे मजबुतीकरण होणार आहे. निवेदन देऊनही पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने श्री आईर यांनी बेमुदत उपोषण छेडण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात शेवटी म्हटले आहे.

You cannot copy content of this page