स्वर संदेश कराओके म्युझिकल क्लासेसतर्फे महंमद रफी यांना वाहिली आदरांजली…

⚡कणकवली ता.२६-: ज्येष्ठ लेखक कवी आणि गायक महेश काणेकर यांच्या संकल्पनेतून संदेश रावले प्रस्तुत स्वर संदेश कराओके म्युझिकल क्लासेस कणकवली कनकनगर येथे जगविख्यात स्वर्गीय आवाज लाभलेले गायक महंमद रफी यांचा 99 वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यक बाबुराव शिरसाट यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास उत्कृष्ट तबलावादक गिरीष कामत, ध्वनी संयोजक किशोर चव्हाण , गायिका अमृता घाडी ,राजेश सुरवाडे,महेंद्र चव्हाणआणि या क्लासमधील विद्यार्थी तेजस पाटकर, मंदार कोदे, राजेश वाळके, विलास पवार, सीमा कोदे ,गीता सावंत, दीक्षा बेंडखेळे, लता साटम ,स्नेहा चव्हाण, नमिता मठकर ,जयश्री खोत उपस्थित होते सर्व विद्यार्थी गायक गायिकांनी आपल्या सुरेल सुरांनी रफी यांना आदरांजली वाहण्यात आली .

You cannot copy content of this page