गोळवणमधील विविध विकासकामांचा उद्या शुभारंभ…

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील गोळवण- कुमामे- डिकवल गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ बुधवार दि. २७ रोजी संध्याकाळी ४ वाजता भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यामध्ये डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (रू.१० लाख), जि. प. २० टक्के सेस अनुदान अंतर्गत गोळवण ग्रा.पं. ऑफिस ते गोळवण बौद्धवाडी (समतानगर) जोडरस्ता तयार करणे (रू. ४ लाख), जि. प. स्वनिधी अंतर्गत जि. प. शाळा गोळवण नं. २ इमारत दुरुस्ती करणे (रू. ३ लाख) या कामांचा समावेश आहे. यावेळी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर व सर्व ग्रा.पं.सदस्य यांनी केले आहे.

You cannot copy content of this page