⚡कणकवली ता.२६-: नाताळ सणानिमित्त वरवडे -फणसवाडी येथील चर्चला भेट देऊन, फादर मॅन्युएल डिसिल्वा यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र व शालेय मित्र मंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय या सर्व मंडळाचे वतीने आणि कणकवलीवासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता,
कोरेसाव डिसोझा, रोजीना फर्नांडिस, सल्लागार सुभाष उबाळे, अविनाश गावडे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सन्मानित केले .
राजेंद्र पेडणेकर यावेळी बोलताना म्हणाले, सर्व धर्म सम भाव ही आपल्या देशाची पंरपरा असून, ती आपल्या देशाची संस्कृती असून, म्हणून ती अशीच पुढे चालत रहावी, भगवंत येशू ख्रिस्त यांचा हाच संदेश होता शांततेचा, हा उपक्रम सिंधूदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातही आमच्या सर्व मंडळांनी असेच उपक्रम राबवले आहेत, आणि ते याहीपुढे असेच सुरू राहतील असे राजेंद्र पेडणेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी व्हिक्टोरिया फर्नांडिस, ब्रॅडन डिसोजा, एलिस्टर डिसोजा, रॅक्स म्हापसेकर, जाकिन डिसोजा, एन्थोनी डिसोजा, जेरेट लोबो, सॅम्युएल फर्नांडिस, अॅलेक्स म्हापसेकर व ख्रिस्ती बांधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सुनिल काणेकर, सईद नाईक, प्रसाद पाताडे, महेश वांगणकर,भगवान कासले, प्रसाद घाडिगावकर आदी सर्व मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.
