क्रीडा स्पर्धेत श्रावण नंबर 1 शाळेचे यश….

⚡कणकवली ता.२६-: त्रिंबक हायस्कूल येथे संपन्न झालेल्या आचरा प्रभात स्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेने दैदिप्यमान यश संपादन करत आपली परंपरा कायम राखली आहे.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात 50 मीटर धावणे लहान गट मुली प्रकारात ऋतिका रूपेश परब प्रथम, तनिषा तुषार श्रावणकर द्वितीय, लहान गट मुली लांब उडी नव्या सुरेश राणे द्वितीय, लहान गट मुली उंच उडी ऋतिका रूपेश परब द्वितीय, हर्षदा समीर वेदरे तृतीय, लहान गट मुली ५०×४ रिले द्वितीय, लहान गट मुली खो खो प्रथम, लहान गट मुली कबड्डी द्वितीय, लहान गट मुलगे खो खो व कबड्डी द्वितीय, मोठा गट मुली खो खो प्रथम, मोठा गट मुली १००×४ रिले द्वितीय, मोठा गट मुलगे खो खो द्वितीय, मोठा गट मुलगे १००×४ रिले द्वितीय, समुह गीत गायन लहान व मोठा गट दोन्ही प्रथम क्रमांक तर समुह नृत्य लहान गट प्रथम. या उज्वल यशाबद्दल श्रावण गावचे सरपंच नम्रता मुद्राळे, उपसरपंच दुलाजी परब, विस्तार अधिकारी उदय दिक्षित, केंद्रप्रमुख देऊ जंगले, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, पोलिस पाटील धाकू दळवी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष राजन यादव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, उपाध्यक्ष संगिता वेदरे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष स्वप्निल कोळंबेकर, माता-पालक संघाचे उपाध्यक्ष पायल परब यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, शमा कडूलकर, अमित पवार, प्राजक्ता कोळंबकर, नामदेव एकशिंगे, पोषण आहाराच्या मदतनीस रोहिणी पवार, सुवर्णा दळवी, नृत्याची उत्तम जाण असणारी माजी विद्यार्थीनी समृद्धी परब, शाळा व्यवस्थापन समिती श्रावण गवळीवाडी शाळेचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, उत्तम ढोलकी वादक ओंकार पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. समुहगीत गायन स्पर्धेत हार्मोनियम साथ ओंकार सुनील लाड इयत्ता सातवी, ढोलकी साथ गौरव जगदीश चव्हाण इयत्ता पाचवी शाळा श्रावण गवळीवाडी यांनी उत्तम प्रकारे संगीत साथ देऊन यश मिळवून दिले आहे.
प्रभात स्तरावर विद्यार्थ्यांना सुखरूप प्रवासासाठी श्रावण गावचे माजी सरपंच प्रशांत परब, गणपत उर्फ छोटू पाटकर, संदेश सडेकर यांनी आपल्या वाहनातून व्यवस्था करुन सहकार्य केले आहे.

You cannot copy content of this page