प्रविण मोरजकर:त्रिमूर्ती माध्य.विद्यालय शिरवंडेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..
⚡कणकवली ता.२३-: शिरवंडे सारख्या ग्रामीण भागात पालक, ग्रामस्थ, देणगीदार यांच्या सहकार्याने त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संस्थेने गेल्या तीस वर्षांत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली हे कौतुकास्पद आहे.शाळेच्या प्रगतीसाठी आपण सहकार्य करु असे उद्गार सुकळवाड येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रविण मोरजकर यांनी काढले.
त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा सुकळवाड येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रविण मोरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उत्तम गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी श्री.मोरजकर यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने श्रीसत्यनारायण महापूजा, रांगोळी स्पर्धा, पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.देणगीदारांनी बक्षीस ठेव योजनेसाठी ठेवलेल्या कायमठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून व इतर बक्षीसदात्यांनी दिलेल्या रक्कमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.या वर्षी कु.शिवम संतोष भोगटे व कु.कोमल भालचंद्र जंगले यांची आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सन्मानासाठी निवड करण्यात आली.यावेळी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल व्ही. डी.काणेकर यांचा तसेच मानधन तत्वावर काम करणाऱ्या श्रीमती प्रणिता गांवकर,सौ.सानिका बाक्रे यांचा संस्थेच्या व शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.गेली अनेक वर्षे अनेक सुसंस्कृत विद्यार्थी घडवून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणारे शाळेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांचा माजी विद्यार्थी रघुनाथ गांवकर आणि प्रवीण घाडीगांवकर यांच्या संकल्पनेतून यथोचित सत्कार करण्यात आला . तसेच पत्रकार लक्ष्मीकांत भावे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर शिरवंडे सरपंच सौ चैताली गांवकर, शालेय समिती सदस्य दिपक चव्हाण, दशरथ घाडीगांवकर, पोलिस पाटील आनंद तांबे,असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत पाटील ,रघुनाथ गांवकर, प्रवीण घाडीगांवकर, अजित घाडीगांवकर, जगदीश कासले, शिक्षकेतर संघटना कार्याध्यक्ष प्रदिप सावंत, सुरेश गांवकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी केले.सुत्रसंचलन श्री.काणेकर यांनी केले.तर आभार ज्येष्ठ शिक्षक सुभाष सावंत यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
