कणकवली न.पं. येथे सिंधुरत्न समृद्ध योजना मार्गदर्शन मेळावा…

⚡कणकवली ता.२३-: कणकवली नगर पंचायत,दिनदयाळ अत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधुरत्न समृद्ध योजना यांच्या सहकार्यने स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला.


यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजना प्रकल्प व्यवस्थापक डॉ. आनंद तेंडुलकर, तालुका कृषी अधिकारी श्रीम. वैशाली मुळे, क्षेत्रीय अधिकारी योगेश वालावलकर, कणकवली नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी अमोल अगम, वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष सुचिता पालव, व्यवस्थापिका सिद्धी नलावडे, वस्ती स्तर अध्यक्ष स्वाती राणे, प्रिया सरूडकर, दिव्या साळगावकर, स्वाती गोखले, शहर स्तर संघ व सर्व वस्ती संघ कार्यकारणी सदस्य, सीआरपी व बचत गट सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेतील अनुदानित कर्ज योजना, पशुसंवर्धन योजना, मार्केटिंग याविषयी उपस्थित महिलाना मार्गदर्शन करण्यात आले.

You cannot copy content of this page