शहर वर्धक मंचाचा सहाय्यक अभियंता यांना इशारा; विज बिला संदर्भातील संभ्रम दूर करा*
*💫सावंतवाडी, दि.१५-:* ऊर्जा मंत्र्यांकडून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचे बिल कनेक्शन तोडण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. तर जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाचेही कनेक्शन तोडू नका असे सांगत आहेत. अशावेळी नागरिक आम्हाला विचारत आहेत. त्यामुळे याबाबत वीज वितरणाने संभ्रमावस्था दूर करावी तसेच येथील वीज वितरण कार्यालयातील काही उद्धट उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी आज वीज वितरण च्या सहाय्यक अभियंता राजेंद्र बागलकर यांच्याजवळ शहर वर्धक मंचतर्फे करण्यात आली आहे. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, माजी नगरसेवक विलास जाधव हे उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव म्हणाले, यापूर्वी ऊर्जामंत्री यांनी जे बिल भरणार नाहीत त्यांचे बिल कनेक्शन तोडावेत असे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील कोणाचेही वीज वितरण वीज कनेक्शन तोडू नये अशी सूचना दिली होती. याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून ऊर्जा मंत्र्यांचे ऐकावे की पालकमंत्र्यांचे ऐकावे, काही नागरिक नेमके सत्य काय याबाबत आम्हाला विचारणा करीत आहेत. यासाठी वीज वितरण कार्यालयाबाहेर बिलासंदर्भात ठळक बोर्ड लावावा. आम्हीही याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. सुरेश भोगटे म्हणाले, कोरोना कालावधीत झालेल्या तोट्यातून जनता बाहेर पडली नसतानाही अद्यापही वाढीव वीज बिले येत आहेत. ही बिले त्यांची रक्कम एकत्रितरीत्या भरणे शक्य नाही. त्यावर उपाय सुचवावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावर बागलकर यांनी ज्या ग्राहकांची वाढविले आहेत त्यांना पार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. तसे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. यावेळी जाधव यांनी आपल्या कार्यालयात असलेल्या काही कर्मचाऱ्यांना जनतेशी कसे बोलावे. याबाबत भान नाही वीज समस्ये संदर्भात तक्रार करण्यासाठी संपर्क केल्यास नागरिकांनाच धमकी देण्यात येते. त्यामुळे असा उद्धटपणा आम्ही खपवून घेणार नाहीत असा इशारा श्री जाधव यांनी दिला.
