कुलदेवता मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीचा जपला वसा
*💫वेंगुर्ला दि.१५-:* कुलदेवता मित्रमंडळ खानोली-समतानगर आयोजित २१ वर्षवयोगटासाठी जिल्हास्तरावर खानोलीत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील प्रवेश फि ची सगळी रक्कम या मंडळातील सदस्यांनी नुकतीच अणाव येथील ‘आनंदाश्रय‘ या वृद्धाश्रमाला दान करत सामाजिक बांधिलकीचा वसा जपला. शिवजयंतीचे औचित्य साधून खानोलीतील कुलदेवता मित्रमंडळाने ‘जाणता राजा‘ युवा चषकाचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून फि स्वरुपात जमा झालेली रक्कम मंडळाच्यावतीने अणाव आश्रमच्या सविता बबन परब यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी मंडळाचे विष्णू खानोलकर, शार्दुल खानोलकर, तेजस खानोलकर, कमलेश खानोलकर, हिमांशु खानोलकर, पांडुरंग सरमळकर आणि प्रा.वैभव खानोलकर उपस्थित होते. खानोलीतील कुलदेवता मित्रमंडळाने जपलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल बबन परब यांनी कौतुक केले.
