भाजपा आमदार निलेश राणे यांचा आरोप : एनआयएने चौकशी करण्याची मागणी
*💫मुंबई दि१५-:* भाजपचे आमदार निलेश राणे यांनी सचिन वाझेंवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी आज भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
