अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी विजय कदम…

⚡सावंतवाडी ता.०५-: राष्ट्रवादी-काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना पाच वर्ष सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी कदम यांनी काम केले आहे. राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख श्री मगरे यांनी ही नियुक्ती केली आहे. यासाठी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, महाराष्ट्र राज्याचे चिटणीस माननीय सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या शिफारशीने ही नियुक्ती देण्यात आली आहे. पक्ष वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणाऱ्या असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page